• राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतिक असतात.
• राष्ट्रपती हे भारताचे 'राष्ट्र प्रमुख' (Head of the State) असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो. राष्ट्रपतीपद हे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे.
• कलम ५२ मध्ये 'भारताचा एक राष्ट्रपती असेल' अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम ५३(१) नुसार, भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल याची १) - तरतूद करण्यात आली आहे.
• भारत सरकारचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालविला जातो.
• राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती (Commander-in- Chief) असतील असे घोषित करण्यात आले आहे.
• राष्ट्रपतीची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही, तर अप्रत्यक्षपणे होते.राष्ट्रपतीचा पदावधी पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढे पाच वर्षे इतका असतो.
• भारतीय राष्ट्रपतींचे वेतन 5 लाख प्रति महिना आहे . राष्ट्रपतींना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पगाराच्या 50% पेन्शन मिळते, इतर लाभांसह
• राष्ट्रपतीला आपल्या अधिकृत निवासस्थानाचा (राष्ट्रपती भवन) वापर शुल्क न देता करण्याचा हक्क असतो.
• डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
आणि आता सध्या भरताचे 15 वे राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू .
• राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीशांच्या आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात.
• राष्ट्रपती तिन्ही संरक्षक दलांचे सरसेनापती (Supreme Com- mander) म्हणून कार्य करतात. या अधिकारान्वये, राष्ट्रपती थलसेना, हवाईसेना व नौसेनेच्या प्रमुखांची नेमणूक करतात.
• राष्ट्रपती पुढील उच्च पदस्थांची नेमणूक करतात: भारताचे महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त, संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, राज्यांचे राज्यपाल, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य इत्यादी.
• राष्ट्रपती पंतप्रधानाकडून केंद्र शासनाच्या कामकाजाच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती, तसेच विधिनियमांबाबतच्या तरतुदींबाबत कोणत्याही माहितीची मागणी करू शकतात.
• संसदेचे अधिवेशन बोलविणे (summon) आणि सत्रसमाप्ती करणे (prorogue) याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो. तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना आहे.
• तसेच कार्यरत राष्ट्रपती जेव्हा गैरहजेरी, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कार्य करण्यास असमर्थ असत तेव्हा उप-राष्ट्रपती तेवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीची का पार पाडतो.
• कलम ६१ मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे. महाभियोग केवळ 'घटना भंग' या एकाच कारणावरून लावता येतो.

टिप्पणी पोस्ट करा